Hazri Pro संपले तर काय होते?

तुमचे सगळे मजूर आणि सगळ्या नोंदी राहतात. फक्त आणखी जोडणे थांबते.

Hazri Pro संपले — तुम्ही रद्द केले म्हणून किंवा पेमेंट झाले नाही म्हणून — तरी तुम्ही नोंदवलेले काहीही बंद होत नाही. प्रत्येक मजूर राहतो, आणि तुम्ही हजेरी लावणे, उचल देणे, हिशोब करणे आणि तपशील दाखवणे चालू ठेवू शकता.

फरक एवढाच की मोफत प्लॅनच्या 2 चालू मजुरांपेक्षा जास्त मजूर तुम्ही जोडू शकत नाही किंवा परत आणू शकत नाही. Pro कधी संपले ते सेटिंग्जमध्ये दिसते, आणि पुन्हा घेण्याचे बटणही.

वापराच्या अटी

मदतीचे सर्व विषय